सुस्वागतम !! सदर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !!! . . . . . . . . सदर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !!!

महादेव

आपले सहर्ष स्वागत

Friday 2 April 2021

UDISE PLUS

 विषय :- सन 2020-21 U-DISE PLUS संगणकीकृत करणेबाबत मार्गदर्शक सूचना 


https://udiseplus.gov.in

 

संदर्भ :- 1) स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्रं. D.O.No.S-61011/1/2021/Statistical Bureau, dt.22/03/2021 2) मप्राशिप/समग्र शिक्षा/संगणक/2020-21/1254 दि.30/03/2021. 


 उपरोक्त संदर्भिय पत्रानुसार भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी विकसित केलेल्या युडायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती राज्याजिल्हा/महानगरपालिका/तालुका शाळास्तरावरुन ऑनलाईन पध्दतीने दि.30 सप्टेंबर 2020 या संदर्भिय दिनांकानुसार यु-डायस प्लस प्रणालीमध्ये दि. 31 मे 2021 पर्यंत राज्यातील शाळांची माहिती ऑनलाईन पध्दतीने संगणकीकृत करण्याकरीता कळविले आहे. देशामध्ये कोविड 19 चा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊनची परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे राज्यातील शाळा ऑनलाईन पध्दतीने सुरु आहे. सन 2021-21 समग्र शिक्षा या योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्याकरीता जिल्हयातील शाळांची अद्यावत माहितीची आवश्यकता आहे कोविड-19 चा विचार करता भारत सरकारकडून सन 2019 -20 या वर्षामध्ये विकसित केलेल्या प्रपत्रानुसार सन 2020-21 च्या प्रपत्रामध्ये काहिही बदल न करता शाळांमध्ये उपलब्ध इ गेलेल्या सोयीसुविधांची, शिक्षक, विद्यार्थी, मोफत पाठयपुस्तके, गणवेश, दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयीसुविधांची माहिती ऑनलाईन पध्दतीने यु-डायस प्रणालीमध्ये माहे 15 मे 2021 पर्यंत यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अद्यावत करुन पूर्ण करण्याकरिता कळविले आहे. शाळास्तरावर खालील प्रमाणे कार्यवाही करावी.

 1). शाळेच्या मुख्याध्यापकांनी यु-डायस प्लस युजरनेम व पासवर्ड व्दारे शाळेतील बदल झालेल्या सोयीसूविधांची माहिती यु डायस प्लस प्रणालीमध्ये 15 मे 2021 पर्यंत पूर्ण करण्यात यावी. माहिती प्रणालीमध्ये अद्यावत करणे पूर्ण झाल्यानंतर माहिती अचूक असल्याचे Self Declaration प्रमाणपत्र Upload करावे. 

 2) सन 2019-20 या वर्षाची माहिती सादर केली आहे. सन 2020-21 या माहितीमध्ये शाळेमधील भौतिक सोयीसुविधा तसेच शिक्षक माहिती मध्ये बदल झाला असल्यास त्याची नोंद करावी. विद्यार्थी संख्या नोंद करावी. इतर माहिती पुन्हा नोंदविण्याची गरज नाही.

 3)मुख्याध्यापकांनी शाळेची माहिती पूर्ण भरुन झाल्यानंतर School Report Card व भरलेले यु-डायसचे प्रपत्र माहितीसाठी डाऊनलोड करुन घ्यावे. 

 1).शाळेचे उच्चीकरण झाले असलेस तसेच व्यवस्थापन बदल करणेचे असलेस या कार्यालयास अवगत करावे.

 2) Udise+ प्रणालीमधील भाग-2 मधील रहा क्र. 2.4 शाळेत उपलब्ध असलेल्या वर्गखोल्यांचा तपशील 2.4(a) मधील अध्यापनासाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण वर्गखोल्यांची संख्या व 2.4(c) मधील शाळेतील एकूण खोल्यांची स्थिती या माहितीशी जुळली पाहिजे. 

 3) समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत 4.6 मध्ये मतिमंद विदयार्थ्यांची माहिती 13 क्रमांक (Intelectual Disability) रकान्यामध्ये नमूद करावी.

 4) PGI(Performance Grading Index) बाबत महत्वाच्या बाबी. (1) मुख्याध्यापक वर्ग खोली (2) दिव्यांग विद्यार्थ्यासाठी रॅम्प सुविधा (3) दिव्यांग विद्यार्थ्यासाठी कमोड सुविधा (4) आधारकार्ड असलेल्या शिक्षकांची माहिती (5) विद्यार्थी बायोमॅट्रीक पध्दतीने उपस्थिती (6) शिक्षकांची बायोमॅट्रीक पध्दतीने उपस्थिती (7)शाळा तपासणी व शाळा सुधार आराखडा माहिती (8) PFMS (समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळेचे बँक खाते माहिती) प्रणालीमध्ये शाळेची नोंद (9) शाळेचे प्रत्यक्ष कामाचे दिवस (10)मोफत पाठयपुस्तके व शैक्षणिक साहित्य प्राप्त माहिी. (11) शैक्षणिक वर्षातील अधिकारी/कर्मचारी भेटीचा अहवाल ( 12)भौतिक सुविधाउपलब्धता(पिण्याचेपाणी,स्वच्छतागृहे,विद्युत्तीकरण,खेळाचे मैदान,फर्निचर इ.) (13)लोकसहभाग, NGO, सामाजिक सहभाग व इतर स्त्रोतातून शाळेस मिळालेल्या आर्थिक सहाय्यबाबतची माहिती. 


 5) गणवेश अनुदान अंतर्गत विद्यार्थ्यांची नोंद करताना SC, STसंवर्गा मधील विद्यार्थ्यांची नोंद BPL विद्यार्थ्यामध्ये करु नये. 


 6) आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांची इयत्ता निहाय नोंद करणेत यावी.

 7) शाळेस धार्मिक अल्पसंख्याक मान्यता असेल तरच शाळा धार्मिक अल्पसंख्याक आहे का मध्ये होय म्हणावे.

 8) शालेय परिसरात अंगणवाडी आहे काय?(1.36) याबाबत शाळांनी आपले परिसरातील अंगणवाडीचे वाटप करुन त्या अंगणवाडीतील मुलांचीच माहिती नमुद करावी. 

 9) शाळेचे प्रत्यक्ष कामाचे दिवस (1.37) 220 पेक्षा कमी व 365 पेक्षा अधिक नसावेत.

 10) भाग 4 मधील मुद्दा क्रं.4.1.1 पूर्व प्राथमिक विद्यार्थी संख्या ही 4.2 (a) मध्ये पूर्व प्राथमिक मध्ये असली पाहिजे.

 11) भाग 4 मधील मुद्दा क्रं.4.1.2 इयत्ता पहिलीतील नवीन प्रवेश संख्या ही 4.2(a) मध्ये इ. 1ली मध्ये असली पाहिजे. 

 12) भाग 4 मधील मुद्दा क्रं.4.2 चालू शैक्षणिक वर्षातील एकूण विद्यार्थी संख्या ही मुद्दा क्रं. 4.4(वयोगटानुसार) व मुद्दा क्र.4.5(माध्यमनिहाय) जुळली पाहिजे. 

 13) भाग-6 वार्षिक परिक्षेचा निकाल मुद्दा क्रं. 6.1व मुद्दा क्रं.6.2 मध्ये शाळेतील शेवटच्या वर्गाचा निकाल भरावा. 



14) भाग-7 मध्ये इ,10वी नियमीत व इतर विद्यार्थी यांचा परिक्षेला बसलेला निकाल भरणेबाबत. मुद्दा क्रं.7.1(a) मधील विद्यार्थी संख्या व 7.2 मधील टक्केवारीचा निकालमध्ये जुळली पाहिजे. तसेच 7.1(b) मधील विद्यार्थी संख्या 7.3 मधील संख्या जुळली पाहिजे. 7.4 (12वी परीक्षा) नियमित व इतर विद्यार्थी परीक्षा निकाल 7.4 व 7.6 मधील विद्यार्थी संख्या जुळली पाहिजे तसेच 7.5 व 7.7 मधील विद्यार्थी संख्या जुळली पाहिजे. 15) भाग-10 व भाग-11 मधील माहिती काळजीपूर्वक व वस्तुनिष्ठ भरावी. माहिती भरणाच्यांनी वरील सुचनांचे वाचन करुन त्याप्रमाणे माहिती भरावी. माहिती चुकीची आढळल्यास ती दुरुस्ती करण्यासाठी तालुकास्तरावर यावे लागेल याची नोंद घेणेत यावी.