सुस्वागतम !! सदर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !!! . . . . . . . . सदर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !!!

महादेव

आपले सहर्ष स्वागत

Sunday 7 February 2021

समग्र शिक्षा अभियान युको व युवा क्लब

 समग्र शिक्षा अंतर्गत युवा व इको क्लबसाठी मिळलेल्या रकमेचा विनियोग समग्र शिक्षा अंतर्गत युवा व इको क्लबसाठी मिळलेल्या रकमेचा विनियोग कसा करणार ?


समग्र शिक्षा अंतर्गत युवा व इको क्लबसाठी मिळलेल्या रकमेचा विनियोग कसा करणार ?






सन 2020-21 मध्ये युवा व इको क्लब स्थापन करून त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना शासनाने याअगोदरच  दिलेल्या आहेत. त्यासाठी लहान शाळांना 5000 व मोठ्या शाळांना 10,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत.चला तर मग, जाणून घेऊया कशा प्रकारे आपण युवा व इको क्लब स्थापन करू शकतो...?


                विदयार्थ्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी, त्यांचेमधील नेतृत्व गुण, प्रतिभा आणि सर्जनशीलता यामध्ये वाढ, आत्मविश्वास, छंद आणि विविध कौशल्ये विकसित करण्यासाठी युवा क्लब स्थापन करणे आवश्यक आहे. यानुषंगाने शाळामार्फत युवा क्लब स्थापन करावयचे आहेत मा. पंतप्रधान भारत सरकार यांचे युवा शक्तीच्या बाबतीत विशेष दृष्टीकोन आहेत. युवा शक्ती सुधारल्यास देशाचा विकास होतो. यामध्ये पुढील क्लबचा समावेश करता येईल. वादविवाद क्लब, कला आणि संस्कृती क्लब, लघुचित्रपट तयार करणारे क्लब, विज्ञान क्लब, पुस्तक वाचन क्लब, फोटोग्राफी क्लब, क्रीडा क्लब, स्वंयसुरक्षितता क्लब, पर्यावरण किंवा इको क्लब इत्यादी, सन २०१९ २० करीता वादविवाद क्लब, कला व संस्कृती क्लब, पुस्तक वाचन क्लब आणि क्रीडा क्लब प्रथम टण्यामध्ये स्थापन करावयाचे आहे.

युवा व इको क्लब नव्याने संकल्पना अंतर्भूत असल्यामुळे व केंद्रशासनाकडून याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना प्राप्त न झाल्यामुळे राज्यस्तरावर समग्र शिक्षा अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम सन २०१९-२० या लेखाशीर्षाखाली युवा व इको क्लब या उपउपक्रमाखाली राज्यातील  उच्च प्राथमिक शाळांसाठी रु. १०,०००/- प्रति शाळा याप्रमाणे व  प्राथमिक शाळांसाठी रुपये ५०००/- प्रति शाळा याप्रमाणे रक्कम राज्यस्तरावरून निश्चित करण्यात आलेली आहे. सदर तरतूद फक्त शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी मंजूर आहे.

  संबंधित शाळांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या पूर्व मान्यतेने शाळा स्तरावरून तरतूद खर्च करावयाची आहे. मंजूर तरतूदीपेक्षा जादा खर्च केल्यास जादाची तरतूद शाळा व्यवस्थापन समिती मार्फत उभी करावी शासनाकडून ती मंजूर केली जाणार नाही. निश्चित केलेली तरतूद विभाग / जिल्हा / तालुका स्तरावरून खर्च करता येणार नाही. केंद्राअंतर्गत शाळांनी केंद्रस्तरावर एकत्र येऊन संबंधित क्लबसाठी लागणाच्या तरतूदीचे क्लबनिहाय सूक्ष्म नियोजन करावे व मंजूर तरतूदीमध्ये केंद्र स्तरावर क्लब स्थापन करून त्याची मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी करावी. क्लबचा प्रमुख, विद्यार्थ्यांमधून निवडणूक पद्धतीने निवडावा. विविध क्लबच्या कामकाजात आवड असणाऱ्या निवडक शिक्षकांच्या मदतीने क्लब तयार करून घ्यावेत.एका क्लब मध्ये कमीत कमी ११ व जास्तीत जास्त कितीही सदस्य राहु शकतील, प्रत्येक क्लबसाठी स्वतंत्र समिती करावी. समितीचे समितीप्रमुख व सचिव आणि बाकी सर्व सदस्य अशी रचना असावी. क्लबनिहाय क्लबची सदस्य यादी केंद्रस्तरावर दर्शनी फलकावर निदर्शनास आणून दयावी.क्लबच्या कार्यपध्दतीबाबत खालीलप्रमाणे सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.


१)वादविवाद क्लब


विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढावा, बोली भाषा तसेच वकृत्व शैली सुधारावी, विद्यार्थ्यांमध्ये साहसी वृत्ती वाढवावी तसेच नेतृत्व गुणांस वाव मिळावा ही वादविवाद क्लबची उद्दिष्टये राहतील वादविवादामध्ये आवड असलेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांच्या मदतीने क्लब तयार करावा.

दोन किंवा दोनपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे दोन गट तयार करून त्यांच्यामध्ये पुढील विषयाच्या आधारे वादविवाद घेता येईल. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, स्त्री-पुरुष समानता, डिजीटल कामे, लोकशाही सक्षमीकरण, शाळा व्यवस्थापन, नियोजन, प्रसार माध्यम, शासनाच्या विविध योजना इत्यादी वादविवाद स्पर्धा आयोजित करून त्यामध्ये उत्कृष्ठ वाद विवाद घडवून आणणाच्या तीन विद्यार्थ्यांना/गटांना शालेय वस्तुस्वरुपात पारितोषिक देण्यात यावे. या वादविवाद क्लबमार्फत विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, आत्मविश्वास, साहसी वृत्ती, कलागुणाना वाव इत्यादी कौशल्यामध्ये यांची वाढ होणे अपेक्षितआहे.


वादविवाद स्पर्धेत उत्कृष्ट वाद विवाद घडबून आणणार्या ३ विद्यार्थी निवडण्यात यावे. तीन विजेत्यांना शालेय वस्तुस्वरुपात/ ग्रंथ स्वरुपात पारितोषिक देण्यात यावे. वादविवादासाठी घेतलेल्या विषयाची इंग्रजी भाषेतील माहिती जिल्हास्तरावर व संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांना पाठविण्यात यावी.


2 ) कला आणि संस्कृती क्लब


या क्लब मध्ये कला, संगीत आणि नृत्य यांचा समावेश करण्यात यावा. विद्यार्थ्याच्या अंगी असणाऱ्या उपजत कलांचे जतन व विकास हे या क्लबची उद्दिष्ट आहे. यामध्ये विविध नृत्य, गायन, वादन, वकृत्व तसेच स्थानिक संस्कृती जतन करण्यासाठी प्राचिन संस्कृती जपणारे कलाप्रकार अशा प्रकारच्या कलांमध्ये गुणात्मक वाढ होण्यासाठी सदर क्लबची स्थापना करण्यात यावी.विविध कलांमध्ये आवड असलेल्या व स्थानिक संस्कृतीची जाण असलेल्या विद्यार्थ्यांचा, शिक्षकांच्यामदतीने कला व संस्कृती क्लब तयार करावा. विविध भारतीय नृत्य प्रकार, स्पर्धा, नाटयछटा, पथनाटये एकांकिका, लोककला, स्पर्धा आयोजित करून त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यात यावा. या उपक्रमामधून लोकजागृती होईल, असे सुद्धा विचारात घ्यावे. उपरोक्तनुसार स्पर्धा घेण्यात याव्यात. 

स्पर्धा आयोजित करून प्रत्येक प्रकारच्या स्पर्धेनुसार प्रथम तीन गट / विजेत्यांना शालेय वस्तुस्वरुपात पारितोषिक देण्यात यावे. घेतलेल्या स्पर्धाची इंग्रजी भाषेतील माहिती जिल्हास्तरावर पाठविण्यात यावी.स्पर्धा आयोजित करण्यासाठी व पारितोषिकांसाठी येणारा खर्च शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन त्या क्लब साठी मंजूर केलेल्या रकमेतून भागवावा.


3 ) पुस्तक वाचन क्लब


विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना वाचनाची सवय लागावी, त्यांचे वाचन सुधारावे भाषा समृध्द व्हावी इत्यादी उद्दिष्ट समोर ठेवून पुस्तक वाचन क्लब निर्माण करण्यात यावा. सन २०१६-१७ ते सन २०१८-१९ पर्यंत शाळांना ग्रंथालय समृद्धीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. तसेच पूरक वाचनाच्या पुस्तकांचा सुद्धा पुरवठा करण्यात आलेला आहे. तसेच सन २०१९ २० मध्ये पूरक वाचनाच्या पुस्तकांचा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेकडून होणार आहे. सद्यस्थितीत शाळेतील ग्रंथालये विविध पूरक वाचनाच्या पुस्तकांनी समृद्ध आहेत. वाचनाची व्यक्तीमत्व विकासासाठी उपयुक्तता, ज्ञानात भर पडणे, वकृत्व सुधारण्यासाठी होणारी मदत भविष्यात विविध स्पर्धा परिक्षांसाटी वाचनामुळे होणारे फायदे, सामान्य ज्ञान, समाज, राज्य,देश जगाची होणारी ओळख, अनेक मोठया व्यक्तींची आत्मचरित्र्ये, त्याचे कतृत्व, देशप्रेम यापुस्तकांचा वापर करून पुस्तक वाचन क्लब मधील सदस्य विद्याथ्यांचे वरील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षकांच्या मदतीने प्रयत्न करण्यात यावे.पुस्तक वाचन क्लबमधील सदस्यांच्या मदतीने पूरक पुस्तकांचा वापर विद्यार्थ्यांच्या पालकांनासुद्धा करता येईल. यामुळे पालकांमध्ये जनजागृती निर्माण करणारे संदेश जातील व समाजसुधारणा घडण्यास मदत होईल. युवा क्लब या लेखाशीर्षाखाली प्राप्त होणारा निधी पुस्तक खरेदीसाठी वापरण्यात येऊ नये. या क्लबमध्ये विद्यार्थ्यांनी उपरोक्त कौशल्ये आत्मसात केल्यानंतर त्यांच्यामधून काही विद्यार्थी निबंध, कथा, कविता, संवाद तयार करू शकतील. अशा विद्यार्थ्यांची भाषा विषय शिकविणाऱ्या शिक्षकांच्या मदतीने वाचन,लेखन स्पर्धा घेण्यात याव्या. पुस्तके वाचन क्लबच्या सदस्य विद्यार्थ्यांमधून उपरोक्त स्पर्धमधून उत्कृष्ट निबंध, कथा, कविता, संवाद लिहिणान्या ३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य स्वरुपातील पारितोषिक देण्यात यावे, इंग्रजी भाषेतील ३ उत्कृष्ट निबंध, कथा, कविता, संवाद जिल्हास्तरावर पाठविण्यात यावे, जिल्हास्तरावरून यामधील ३ उत्कृष्ट निबंध, कथा, कविता, संवाद राज्यस्तरावर संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांना पाठविण्यात यावे. स्पर्धेसाठी लागणारा स्टेशनरी खर्च प्रथालयात बैठक व्यवस्था, आवश्यक फलक जसे शांतता राखा, आपसात बोलू नका, इतरांना वाचनात अडथळा आणू नका इ. वाचनालयाची रंगरंगोटी , विविध चित्रे, महान व्यक्तींचे फोटो इ. साठी येणारा खर्च युवा व इको क्लब या लेखाशीर्षाखाली उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीमधून शाळास्तरावरून करावा.


४) क्रीडा क्लब -


विद्याथ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण व्हावी, त्यांचे मानसिक व शारिरीक आरोग्य सुधारावे, शाळेत नियमित उपस्थित राहण्याची सवय लागावी इत्यादी उद्दिष्ट समोर ठेवून क्रीडा पलवची निर्मिती करण्यात यावी.सद्यस्थितीत विद्यार्थी परंपरागत खेळ न खेळता, स्मार्ट फोनचा वापर करून ऑनलाईन अथवा ऑफलाईन खेळ खेळताना दिसतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. यामुळे परंपरागत खेळ विद्यार्थ्यांनी खेळणे आवश्यक आहे. यामध्ये मैदानी खेळ कबड्डी, खो-खो, लपाछपी, पकड़ा-पकडी, विटी-दांडू, गोटयाचे डाव, भोवऱ्याचे डाव, पतंग ठडविणे, क्रिकेट, लगोरी, लंगडी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कवायत, धावणे, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, काटी फिरवणे, स्नी सायकल, फास्ट सायकल, बॅडमिंटन, फुटबॉल, बास्केटबॉल,कुस्ती, आंधळो-कॉशिबीर, तळयात-मळयात, बेड़कउडया तसेच कॅरम, बुद्धीबळ अशाप्रकारचे विद्यार्थ्याच्या वयोगटानुसार खेळ घेणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्याचा मानसिक व शारिरीक विकास होतो,क्रीडा विषयी आवड असणाऱ्या विद्यार्थ्याच्या शिक्षकांच्या मार्फत क्लब स्थापन करावा शाळेमध्ये उपलब्ध असणारे क्रीडा विषयक साहित्याचा वापर करून विविध क्रीडा शिक्षकामार्फत क्रीडा स्पर्धा घेण्यात याव्यात. विविध स्तरावर होणान्या क्रीडा स्पर्धाची माहिती द्यावी. वेगवेगळया क्रीडाप्रकारात अतिउच्च कामगिरी केलेल्या खेळाइंची माहीती द्यावी. उत्कृष्ट ३ क्रीडा पटूंचा शालेय अथवा क्रीडा साहित्य स्वरुपात पारितोषक देण्यात यावे, पारितोषकासाठी लागणारा खर्च समग्र शिक्षा अंतर्गत युवा व इको क्लब या लेखाशीर्षाखाली उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीमधून शाळांमार्फत करण्यात यावा, या निधीमधून खेळाचे साहित्य खरेदी करण्यात येऊ नये. प्रथमोपचार पेटी, मैदाने आखण्यासाठी येणारा खर्च विविध खेळांमधील प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी निमंत्रित म्हणून बोलविता येईल व त्यांच्या मानधनासाठी होणारा खर्च या साठी मिळणाऱ्या अनुदानातून शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने करण्यात यावा शाळास्तरावरून खरेदी करण्यात यावी.


विविध क्लबच्या निर्मितीसाठी लागणारी स्टेशनरी, शालेय साहित्य स्वरुपालील पारितोषिके, केंद्रस्तरापर्यंत विद्यार्थ्यांना ने-आण खर्च व चहा-नाश्ता याकरीता निश्चित केलेली तरतूद खर्च करता येईल. जिल्हास्तरावर प्राप्त होणारी क्लबनिहाय माहितीचे छाननी करून त्यामधील उत्कृष्ट ३ क्लबची माहिती राज्य कार्यालयास पाठविण्यात यावी, राज्य कार्यालयास प्राप्त होणाऱ्या क्लबच्या माहितीमधून उत्कृष्ठ काम करणाऱ्या क्लबची माहिती केंद्रशासनाच्या शगुन पोर्टलवर अपलोड करण्यात येईल.